शीखबहुल पंजाबमधील काँग्रेसचे हिंदु नेते सुनील जाखड यांची खंत !
|
चंडीगड (पंजाब) – मी हिंदु असल्याने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या स्पर्धेतून बाहेर फेकलो गेलो, असे विधान पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड यांनी केले आहे. पंजाब शीखबहुल राज्य आहे. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून लवकरच नाव घोषित करण्यात येणार आहे. आम आदमी पक्षाने भगवंत मान या शीख नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सध्याचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू यांच्यात रस्सीखेच चालू आहे.
In an exclusive chat with India Today TV, Jakhar said that he was hurt that ‘advisors sitting in Delhi said that a Sikh face would be suitable for the CM post’ | @kamaljitsandhu#PunjabElections2022 #PunjabPolls #Congresshttps://t.co/OM5ZEuNNfA
— IndiaToday (@IndiaToday) February 2, 2022
‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जाखड यांनी म्हटले, ‘देहलीमधील पक्षाचे सल्लागार नीट सल्ले देत नाहीत. मी आमदार नसल्याने मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले नसते तर ठीक होते; मात्र मी ‘पंजाबी हिंदु’ असल्याने असे करणे योग्य नाही. यामुळे तुम्ही हिंदु समुदायावर आघात केला आहे. एका दलित चेहर्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवणे योग्य असेल, तर त्यांनाच सातत्याने पाठिंबा दिला पाहिजे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल हे पक्षाने लवकरात लवकर ठरवले पाहिजे.’