पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्‍याने व्यक्त केलेली व्यथा !

ज्येष्ठ अधिकार्‍यांच्या दृष्टीने चांगले काम करणार्‍या बहुतांश कर्मचार्‍यांची शून्य किंमत असणे आणि कर्मचार्‍यांनी चांगले कृत्य करूनही त्याचे श्रेय हुजरेगिरी करणार्‍यांनाच दिले जाणे

‘मी व्यसनाधीन, जुगार खेळणारा, कर्जबाजारी, शासकीय काम केल्यावर लाच घेणारा, अधिकार्‍यांपुढे हुजरेगिरी करणारा आणि त्यांना पैसे देणारा अशांपैकी नव्हतो. त्यामुळे मला माझ्या कामाच्या व्यतिरिक्त अन्य कामे करावी लागत असत. कधीकधी मला ताण यायचा. माझ्या या स्वभावामुळे मला पोलीस विभागात मित्रही अल्प होते. कर्मचार्‍याने कितीही व्यवस्थित काम केले, तरी अधिकार्‍यांपुढे त्याची किंमत शून्य असते; कारण त्यांना चुकीच्या कामात साहाय्य करणारी व्यक्ती हवी असते. तुम्ही प्रलंबित काम योग्य प्रकारे केल्यावर तुमच्याकडे दुसरे प्रलंबित काम सोपवले जाते. तसेच त्याचे श्रेय आणि मोबदला न देता त्याचे श्रेय दोष असलेल्या कर्मचार्‍यांनाच दिले जाते. एवढेच नाही, तर ज्येष्ठ अधिकार्‍यांपुढे ‘तुम्ही चुकीचे आणि कामचुकार आहात’, असे सांगितले जाते.’

– एक पोलीस कर्मचारी