६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. ओवी नवनाथ बर्डे (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. ओवी बर्डे ही या पिढीतील एक आहे !

सात्त्विकतेची ओढ असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. ओवी नवनाथ बर्डे (वय २ वर्षे) !

चि. ओवी बर्डे
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनच्या साधिका सौ. सीमा भोर यांची नात चि. ओवी नवनाथ बर्डे हिची तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. बालिकेच्या जन्मापूर्वी

सौ. सीमा भोर

१ अ. देवदर्शन आणि प्रसाद यांविषयी आलेल्या अनुभूती

१. ‘गर्भारपणाच्या दुसर्‍याच मासात मला गिरनार येथील दत्ताची विभूती आणि प्रसाद मिळाला.

२. यजमानांकडून प्रतिदिन ३ – ४ घंटे दत्ताचा नामजप होत होता. ते नियमितपणे ‘नवनाथ भक्तीसार’चे वाचन करत होते आणि दत्तजयंतीच्या काळात त्यांनी घरी गुरुचरित्राचे पारायण केले. मला नरसोबाच्या वाडीचा प्रसादही मिळाला.

३. यजमान इतक्या वर्षांत प्रथमच कुलदेवीच्या दर्शनाला गेले. त्यामुळे मला तेथील प्रसाद मिळाला.

४. मला गर्भारपणात वैष्णोदेवीचाही प्रसाद मिळाला.

५. गर्भारपणात मी शिवचरित्र वाचत होते. त्या वेळी मला बाळाची हालचाल अधिक जाणवत होती.

६. मला गर्भारपणात २ वेळा रामनाथी आश्रमातील प्रसाद अन् कुंकू मिळाले आणि परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव बघता आला.

गर्भारपणात मला पुष्कळ ठिकाणचा प्रसाद मिळाला आणि ‘याद्वारे बाळाला देवाचा आशीर्वाद मिळत आहे’, असे मला वाटले.

१ आ. श्लोक, स्तोत्रे आणि नामजप करणे

१. गर्भारपणी मी मनाचे श्लोक अन् दत्तबावनी ऐकणे आणि रामरक्षा म्हणणे याला आरंभ केला.

२. माझे नियमितपणे दत्त, श्री भवानीदेवी आणि गणपति यांचे नामजप होत होते. याच काळात नामजप करतांना मी गर्भातील बाळाला म्हणायचे, ‘चल, आपण आता दत्तगुरूंचा नामजप करूया.’ तेव्हा नामजप करतांना बाळाची हालचाल अधिक जाणवत असे.

१ इ. गर्भारपणात मला अन्य पंथाच्या आधुनिक वैद्यांकडून उपचार करून घेतल्यावर बरे वाटत नव्हते. मी सनातनच्या साधक आधुनिक वैद्यांचे उपचार चालू केल्यावर मला त्वरित आराम वाटू लागला.’

– सौ. प्रियांका नवनाथ बर्डे (ओवीची आई)

१ ई. अनुभूती : ‘ताई गरोदर असतांना तिच्या पोटावर हात ठेवला की, आपोआप कृष्णाचा नामजप व्हायचा.’ – कु. प्रणिता भोर (ओवीची मावशी), कल्याण

२. प्रसुती आणि बालिकेचा जन्म

सौ. प्रियांका बर्डे

अ. ‘प्रसुतीच्या वेळी प्रियांकाला पुष्कळ त्रास झाला. रुग्णालयात ती २० घंटे सतत चालत होती. शेवटी दुसर्‍या दिवशी सकाळी ६.३० वाजता तिला प्रसुतीगृहात नेले; पण ती प्रतिसाद देत नव्हती. मी सतत प्रार्थना करत होते आणि घरातील सगळ्यांना प्रार्थना करायला सांगितली. मी सूक्ष्मातून तिच्याभोवती दत्ताच्या नामजपाच्या पट्ट्या ठेवत होते आणि तिच्याभोवती ‘जय गुरुदेव’ नामाचे मंडल करत होते. थोड्या वेळाने परिचारिका बालिकेला घेऊन बाहेर आल्या, तेव्हा गुरुमाऊलींप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’ – सौ. सीमा भोर (ओवीची आजी, आईची आई)

आ. ‘मला प्रसुतीच्या वेळी पुष्कळ त्रास होत होता. तेव्हा माझा दत्तगुरूंचा नामजप चालू होता. १५.६.२०१९ या दिवशी शनिवारी सकाळी ८.१६ मिनिटांनी माझी प्रसुती नैसर्गिकरित्या झाली आणि मला मुलगी झाली.’ – सौ. प्रियांका नवनाथ बर्डे

३. जन्मानंतर 

३ अ. जन्म ते ३ मास

१. ‘बालिकेला प्रसुतीगृहाच्या बाहेर आणले, तेव्हा तिचे डोळे उघडे होते. मी तिच्याशी विचारले, ‘‘आईच्या पोटात असतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप कुणी केला ? तू पुष्कळ नामजप केलास ना ?’ तेव्हा तिने डोळे बंद करून सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पुन्हा लगेच डोळे उघडले.

२. बालिका ८ दिवसांची असतांना तिला पावडर लावलेला डबा पलंगावर उलटा पडला होता. त्यावर पावडरचा ‘ॐ’ उमटलेला दिसला.

३. बालिकेच्या जन्मानंतर १ आठवडा पाण्याची पुष्कळ अडचण होती; पण बारशाच्या दिवशी अकस्मात्पणे भरपूर पाणी येऊन आठवडाभराचे सगळे कपडे धुता आले आणि घरही स्वच्छ करता आले.’

– सौ. सीमा भोर

४. प.पू. भक्तराज महाराज, श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचा जयघोष केल्यावर ओवी जयजयकार करण्यासाठी हात वर करत असे. तेव्हा ती केवळ एक मास २५ दिवसांची होती.

५. माझ्या सासूबाई कधीही नामजप करत नव्हत्या; पण ओवी झाल्यावर त्या तिला घेऊन ‘श्री गुरुदेव दत्त ।’, असा नामजप करू लागल्या.

६. ओवीचा जन्म झाल्यापासून आमचे चित्रपटातील गाणी ऐकणे बंद झाले आहे. घरात केवळ भजनेच लावली जातात.

७. ओवी फार शांत आहे. तिचा तोंडवळा नेहमी हसरा असतो.

८. तिचे पाय नेहमी श्रीकृष्णासारखे ठेवलेले असतात.

– सौ. प्रियांका नवनाथ बर्डे

९. ‘तिने बोटांच्या नेहमी मुद्रा केलेल्या असतात.’ – सौ. सीमा भोर आणि सौ. प्रियांका नवनाथ बर्डे

कु. प्रणिता भोर

१०. ‘ओवीच्या समोर पहिल्यांदा दैनिक ‘सनातन प्रभात’ धरून ‘प.पू. बघ’, असे म्हटल्यावर ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ या चौकटीतील गुरुदेवांच्या छायाचित्राकडे एकटक बघत होती.

११. ओवी घरात आल्यापासून मला घरात पालट झाल्यासारखा वाटतो. ‘घरातील वातावरण सात्त्विक झाले आहे’, असे मला वाटते. ’

– कु. प्रणिता भोर (ओवीची मावशी) कल्याण

३ आ. ४ मास ते ७ मास

१. ‘माझ्या सासरी कुणीही कुलाचार केलेले नव्हते. ओवीच्या जन्मानंतर ४ मासांनी सर्वांचे देवदर्शन झाले आणि सर्व कुलाचार झाले.

(सर्व सूत्रांचा दिनांक २८.५.२०२०)

२. ओवी कितीही रडत असली, तरी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची भजने लावल्यावर ती रडायची थांबते.

३. तिला ‘श्रीकृष्ण बाप्पा कुठे आहे ?’ असे विचारले की, ती श्रीकृष्णाच्या छायाचित्राकडे बघते आणि पुष्कळ हसते. त्या वेळी ‘ती श्रीकृष्णाशी बोलत आहे’, असे मला वाटते. ती श्रीकृष्णाच्या छायाचित्राकडे जायचा आणि त्याला हात लावायचा प्रयत्न करते. तिला श्रीकृष्णाचे छायाचित्र बघून फार आनंद होतो.’

– सौ. प्रियांका नवनाथ बर्डे

४. ‘प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावली की, ती आनंदाने हालचाल करते.

५. ‘मुद्रा कर’, असे म्हटले की, तिच्या हातांची हालचाल चालू होते आणि आम्ही नामजपाला आरंभ केला की, आपोआप तिच्या हातांची मुद्रा होते.

६. ती झोपेत असतांना तिला हालवून उठवले, तरी ती उठत नाही; पण नामजप केला की, लगेच उठते.’

– सौ. सीमा भोर (ओवीची आजी)

३ इ. ८ मास ते १२ मास

१. ‘ओवीला भरवतांना श्रीरामरक्षा स्तोत्र, हनुमानचालीसा किंवा श्रीरामाचा नामजप केला, तरच ती व्यवस्थित जेवते.’ – सौ. प्रियांका नवनाथ बर्डे

२. ‘तिला ‘नामजप कर’, असे म्हटले की, लगेच तिच्या तोंडाची हालचाल होते.

३. तिच्याजवळ गेले की, माझा नामजप आपोआप चालू होतो.’

– सौ. सीमा भोर (ओवीची आजी)

४. ‘ओवी शांतपणे शक्तीस्तवन ऐकते.

५. एकदा ओवी रडत असतांना तिच्या शेजारी ‘यू ट्यूब’वरील सात्त्विक बालकांशी वार्तालाप केलेली ध्वनीचित्र-चकती लावली. तेव्हा ती रडायची थांबली. तेव्हा ‘ती शांतपणे ते ऐकत आहे’, असे मला वाटले.

६. एकदा तिच्याजवळ आम्ही ४ जण ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, असा नामजप करत होतो. त्या वेळी ती फार हालचाल करत होती. तेव्हा ‘तिला पुष्कळ आनंद होत आहे’, असे मला वाटले. त्यानंतर ती झोपल्यावर तिचे पाय नेहमीप्रमाणे नसून पायांचे तळवे एकमेकांना जोडलेल्या स्थितीत होते. ‘सामूहिक नामजपाने ती ध्यानावस्थेत गेली’, असे मला वाटले.’

– कु. प्रणिता भोर

४. स्वभावदोष

‘हट्टीपणा

हे लिखाण प.पू. गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांनी माझ्याकडून लिहून घेतले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – सौ. प्रियांका नवनाथ बर्डे

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.