भ्रष्टाचाराला विरोध केल्याने इराणमध्ये मुष्टीयुद्धपटूला (बॉक्सरला) फाशीची शिक्षा !

वर्ष २०२० मध्येही याच प्रकरणी एका कुस्तीपटूला दिली होती फाशी

इस्लामी देश इराणमध्ये भ्रष्टाचाराला विरोध करणे हा गुन्हा आहे, हे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी जाणतील का ? – संपादक

मुष्टीयुद्धपटू महंमद जवाद

तेहरान (इराण) – भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे इराणमध्ये महंमद जवाद या २६ वर्षांच्या मुष्टीयुद्धपटूला (बॉक्सरला) फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेल्या शांततापूर्ण विरोधासाठी त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये कुस्तीपटू नवीद अफकारी याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुस्तीपटू नवीद अफकारीची शिक्षा क्षमा करण्याचे आवाहन केले होते; मात्र त्यांच्या आवाहनाकडे इराणने दुर्लक्ष केले होते.

‘द सन’ दैनिकाच्या वृत्तानुसार, इराणमध्ये प्रतिवर्षी जवळपास २५० जणांना फासावर चढवले जाते. इराणमध्ये ‘क्रेन’ला लटकवूनही अत्यंत क्रूरपणे फाशी दिली जाते, तसेच चाबकाच्या फटक्यांचा वर्षावही दोषीवर केला जातो.