अबू धाबी येथे झालेल्या २ बाँबस्फोटांत ३ जण ठार, ६ घायाळ !

घटनास्थळ

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ तेलाच्या तीन टँकर्समध्ये झालेल्या स्फोटामध्ये ३ जण ठार झाले असून ६ जण घायाळ झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये २ जण भारतीय वंशाचे नागरिक आहेत. येमेन येथील ईराणचे समर्थन असलेल्या ‘हूदी’ या आतंकवादी संघटनेने या बाँबस्फोटांचे दायित्व स्वीकारले असून हे आक्रमण ड्रोनच्या साहाय्याने करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.