सनातनच्या बालसाधिका कु. मधुरा आणि कु. मयुरा तरकसबंद यांना भगवद्तगीतापठण स्पर्धेत बक्षीस !

कु. मधुरा तरकसबंद
कु. मयुरा तरकसबंद

नवी मुंबई – सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या नेरूळ येथील बालसाधिका कु. मधुरा तरकसबंद आणि कु. मयुरा तरकसबंद यांना भगवद्गीता पठण स्पर्धेत यश मिळाले आहे. कु. मधुरा आणि कु. मयुरा या जुळ्या बहिणी असून त्यांचे वय ११ वर्षे आहे आणि सध्या त्या इयत्ता ६ वीत शिकत आहेत.

या वर्षी चिन्मय मिशनद्वारे ऑनलाईन भगवद्गीतापठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भगवद्गीतेतील दुसर्‍या अध्यायामधील २० श्लोक म्हणायचे होते. त्यात त्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत नवी मुंबईतील अनेक शाळांतून शेकडो मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्या सर्वांमध्ये कु. मधुरा हिचा ३ रा क्रमांक आला असून आणि कु. मयुरा हिला उतेजनार्थ बक्षीस मिळाले. प्रतिवर्षी भगवद्तगीतापठण स्पर्धेत त्या भाग घेत असतात आणि बक्षीस मिळवतात.