योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार

हिंदुत्वाच्या सूत्राला धार देण्यासाठी भाजपचा निर्णय  

योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (लखनौ) – हिंदुत्वाच्या सूत्राला धार देण्यासाठी भाजपने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विधानसभेच्या निवडणुकीसाठी अयोध्येतून उमेदवारी घोषित केली आहे. या निर्णयावर भाजपमध्ये एकमत असल्याचे सांगितले जात आहे. मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठीही आंदोलन उभारले गेल्याने अयोध्येप्रमाणेच मथुरेच्या जागेसाठीही भाजप सक्षम उमेदवार देण्याच्या सिद्धतेत आहे. तथापि तेथे विद्यमान आमदार श्रीकांत शर्मा यांनी निवडणूक लढवण्याची सिद्धता अगोदरपासूनच चालू केली आहे.