‘एकदा सतत दोन दिवस परात्पर गुरुदेव मला त्यांच्या महामृत्यूयोगाविषयी सांगत होते. आमच्या कोणत्याही विषयावरील बोलण्याचा शेवट त्यांच्या मृत्यूयोगाने व्हायचा. त्यातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टर : मी पुढे झोपून असणार आणि नंतर मी नसणार. (माझा मृत्यू होणार.)

मी : परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही स्वतःबद्दल एवढे त्रयस्थपणे कसा विचार करू शकता ? (‘परात्पर गुरु डॉक्टरांची आध्यात्मिक पातळी उच्च आहे’, हे मला ठाऊक असूनही ‘त्यांचा दृष्टीकोन शिकायला मिळावा’, यादृष्टीने मी त्यांना हा प्रश्न विचारला.)
परात्पर गुरु डॉक्टर : आपण कोणतीही परिस्थिती पालटू शकत नाही. रडत रडत आजार सहन करण्यापेक्षा हसत हसत जगायचे. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।। (अर्थ : भगवंताने आपणाला ज्या स्थितीत ठेवले, त्या स्थितीत रहावे. चित्तात मात्र समाधान असावे.) हा संत तुकाराम महाराजांचा अभंग तुला ठाऊक आहे ना ! मी तसा रहातो. मुख्य म्हणजे मला कशाचीही काळजी वाटत नाही.
नंतर पुन्हा काही वेळाने
परात्पर गुरु डॉक्टर : माझा महामृत्यूयोग आहे. मी नसणार.
मी : परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही आम्हा साधकांना असे सोडून जाऊ शकत नाही. तुमच्याविना हे कार्य ( ईश्वरी राज्याची स्थापना) कोण करणार ? तुम्ही आम्हाला हवे आहात.
परात्पर गुरु डॉक्टर : देव आहे ना !
मी : आम्हा साधकांना तुम्ही सगुणातून हवे आहात. देव निर्गुणात आहे. तो आमच्याशी बोलत नाही आणि तो बोलत असला, तरी आम्हाला ते कळत नाही ना !
परात्पर गुरु डॉक्टर : यासाठी तुम्ही तुमची साधना वाढवायला हवी.
यावर मी काहीच बोलले नाही.
परात्पर गुरु डॉक्टर (हसून) : मी गेल्यावर (माझा मृत्यू झाल्यावर) तू अनुभूती लिहून देशील, ‘डॉक्टर नसले, तरी ते सतत सोबत आहेत’, असे मला जाणवते.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या या बोलण्याने मी निरुत्तर झाले.
त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी मला त्यांच्या मृत्यूयोगाविषयी सांगितले, तरी मी त्यांना पुन्हा कधी त्यांच्या सगुण अस्तित्वासाठी आग्रह केला नाही.’
– सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ढवळी,फोंडा, गोवा.