करावी कृपा अपरंपार नाथा ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरु माझे परमदैवत ।
वसती नित्य हृदयात ।। १ ।।

श्री. धैवत वाघमारे

दिव्य तुमचे दर्शन ।
लाभे जिवास समाधान ।। २ ।।

कैसी वर्णू तुमची महती ।
न कळे मज मूढमती ।। ३ ।।

जीवन दिधले अनमोल ।
होई जीव व्याकुळ ।। ४ ।।

न होई मन सेवेत स्थिर ।
असे वेग इंद्रियांचा अपार ।। ५ ।।

धरिता होई जीव कासावीस ।
सोडण्या न सिद्ध इंद्रियांस ।। ६ ।।

बद्ध मी झालो विषयीं ।
जीवननौका खेचली जाये जळी ।। ७ ।।

आता उपाय एकच दिसे ।
तुम्हीच यावे मम हृदयी ।। ८ ।।

शरणागत मी तव चरणी ।
करावी कृपा या दासावरी ।। ९ ।।

सोडण्या कठीण तो संसार ।
तव कृपा हेच एक मुक्तीद्वार ।। १० ।।

निशीदिनी तळमळे जीव हा ।
करावी कृपा अपरंपार नाथा ।। ११ ।।

तव कृपा हेच समाधान जीवनी ।
थोरवी ही तुमची या भूमंडळी ।। १२ ।।

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक