
१. ‘आपण दैवी शक्तीविषयी बोलणे, म्हणजे हिमालयाची उंची मोजण्याचे धाडस करण्यासारखे आहे. हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याचा प्रसाद आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले इथून (रामनाथी आश्रमातून) पुढच्या पिढीला सात्त्विक चैतन्य आणि प्रेम प्रदान करत रहातील. मला आश्रमात सर्वत्र परात्पर गुरुदेवांचे रूप दिसत होते.
२. सूक्ष्म जगताच्या संदर्भातील प्रदर्शन पाहून ‘खरोखर वाईट शक्तीचा प्रभाव असाही होतो’, हे मला ठाऊक झाले.’
– श्री ब्रह्मानंद स्वामी, वाई, सातारा. (२२.११.२०२१)
- वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
- सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
- येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
|