|
चेन्नई – तमिळनाडूमधील मुडिचूरजवळील वरदराजपूरम् येथे जलमार्गाच्या परिसरात बांधण्यात आलेले श्री नरसिंह अंजनेय स्वामी मंदिर महसूल खात्याच्या अधिकार्यांनी ‘अवैध’ ठरवत पाडले. मंदिर तोडण्यास विरोध करणार्या सुमारे २० हिंदूंना पोलिसांनी अटक केली. या परिसरात अनेक अवैध बांधकामे करण्यात आली आहेत; मात्र प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही.
Tamil Nadu: DMK Govt demolishes Anjaneyar temple citing it was ‘illegally constructed’; 20 protesters detainedhttps://t.co/ZOHtYVGDYr
— OpIndia.com (@OpIndia_com) January 11, 2022
वरदराजपूरम् येथील श्री नरसिंह अंजनेयर स्वामी मंदिर ३० वर्षे जुने आहे. वर्ष २०१५ मध्ये तेथील जिल्हाधिकारी अमुदा यांनी या मंदिराची पहाणी केली होती आणि कागदपत्रे पडताळून ‘अतिक्रमण करून मंदिर बांधण्यात आलेले नाही’, असे सांगितले होते; मात्र नगरपालिकेचे अधिकारी ‘मंदिर हे अतिक्रमित केलेल्या जागेवर बांधण्यात आले आहे’, असा दावा करत आहेत. वर्ष २०१७ मध्ये या परिसरात पूर आला होता. ‘जलमार्गाच्या परिसरात हे मंदिर बांधल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही; म्हणून पूर आला’, असे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत; मात्र ‘मंदिरामुळे नव्हे, तर अन्य अवैध बांधकामामुळे येथे पूर आला’, अशी माहिती हिंदूंनी दिली आहे. सरकारने यापूर्वी दोनदा हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भाविकांनी विरोध केल्याने ते प्रयत्न फसले होते.