उच्चपदस्थ नौदल अधिकारी आणि त्यांच्या पत्नी यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिल्यावर व्यक्त केलेले मनोगत !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

१. उच्चपदस्थ नौदल अधिकारी

अ. मला आश्रमात पुष्कळ शांत आणि उत्साही वाटत होते. आश्रमातील स्वच्छता आणि शांत वातावरण, यांमुळे माझे मन एकदम उत्साही झाले. आश्रमाला भेट दिल्यावर मी ज्यांची कल्पना केली नव्हती, अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

आ. सूक्ष्म जगताविषयी माहिती देणारे प्रदर्शन अतिशय अप्रतिम आहे. माहिती देणारे फलक अतिशय अर्थपूर्ण असून ते काळजीपूर्वक आणि चांगल्या प्रकारे बनवले आहेत.

२. उच्चपदस्थ नौदल अधिकार्‍यांच्या पत्नी

अ. आश्रम अतिशय अलौकिक आणि सकारात्मक ऊर्जेने भारित आहे. आश्रमाच्या स्वागत कक्षाजवळ ठेवण्यात आलेली सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेश मूर्ती आणि साधकांच्या समवेत नामजप करत असलेले संत पू. सीताराम देसाईआजोबा यांच्याकडून प्रक्षेपित होणारी ऊर्जा मनाला भुरळ पाडणारी आहे.

आ. आश्रमाच्या लादीवर ‘ॐ’ उमटलेले पहायला मिळणे, ही पुष्कळ सुंदर गोष्ट आहे. त्यातून चांगली शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.

इ. सूक्ष्म जगताविषयी माहिती देणारे प्रदर्शन पहातांना चांगले वाटले. वातावरणातील वाईट शक्ती आणि चांगली शक्ती यांत सूक्ष्मातून होणार्‍या युद्धाविषयीची माहिती चांगल्या प्रकारे समजली.