रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय              

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. सौ. अंजु शर्मा, दाबोळी, वास्को, गोवा. 

अ. ‘मी आश्रमात प्रवेश करताच मला सकारात्मक ऊर्जा अनुभवता आली. मला संधी मिळाल्यास मी माझे उर्वरित आयुष्य आश्रमात घालवू इच्छिते.

आ. आश्रम पुष्कळ पवित्र आणि मनोवेधक आहे. येथे शक्ती आणि शांती दायक मंदिराची अनुभूती आली.

इ. प.पू. गुरुदेवांनी केलेली इतकी अप्रतिम व्यवस्था पाहून आत्मा तृप्त झाला. ईश्वराची कृपा या आश्रमावर नित्य रहावी.’

२. श्री. राज शर्मा, कळंगुट, गोवा.

अ. ‘भगवान श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्रासमोर उभे राहिल्यावर साक्षात् श्रीकृष्ण माझ्या आत आहे’, असे मला वाटले.

आ. गुरुजींच्या छायाचित्रासमोरही चांगले वाटले.’ (सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहून आलेली अनुभूती. – संकलक)

(सर्व सूत्रांचा दिनांक ३०.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक