‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला नवग्रह मंत्रपठण सेवेत सहभागी होण्याची संधी मिळाली. ७.६.२०२४ पासून सकाळी १० ते ११ या वेळेत प्रतिदिन मी सहभागी होऊ लागलो. पहिल्या दिवशी मी ‘मंत्रपठण करायचे मंत्र, त्यांचे उच्चार करण्याची पद्धत आणि कसे म्हणायचे ?’, यांकडे लक्ष दिले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण केल्याने आवर्तन भावपूर्ण आणि एकाग्रतेने करता येणे
मी मंत्र म्हणत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण केले आणि त्यांच्या चरणांकडे पाहून प्रार्थना केली. तेव्हा ‘माझ्या मनाची एकाग्रता वाढत आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे संपूर्ण आवर्तन भावपूर्ण आणि एकाग्रतेने करता आले.
२. मंत्रपठण करतांना माझ्या सप्तचक्रांकडे संवेदना जाणवणे
दुसर्या मंत्रजपाच्या आवर्तनाच्या वेळी मंत्राचे स्पष्ट उच्चार करत मंत्रपठण करतांना माझ्या सप्तचक्रांकडे संवेदना जाणवू लागल्या. त्या संवेदना स्वाधिष्ठान आणि मूलाधार या चक्रांकडे दीर्घ काळ जाणवत होत्या. ९.६.२०२४ या दिवशी वरीलप्रमाणे मंत्रपठण करतांना पुन्हा तशीच संवेदना जाणवली आणि मनाची एकाग्रताही वाढली.
३. प्रभु रामचंद्रांची मूर्ती दिसणे आणि भावजागृती होणे
दुसर्या दिवशी आम्ही नवग्रह मंत्रपठणाच्या सेवेत सहभागी झालो होतो. दुसर्या टप्प्यात रामरक्षेची आवर्तने घ्यायची होती. आरंभी सहसाधक प्रार्थना घेत होते. प्रार्थनेतील शब्द ऐकतांना आमची भावजागृती होऊ लागली. मला प्रभु रामचंद्रांची लहान मूर्ती प्रकाशमय दिसू लागली. नंतर सिंहासनावर बसलेली प्रभु रामचंद्रांची प्रकाशमय मूर्ती ४ ते ५ सेकंद दिसली. त्यानंतर रामरक्षा आवर्तने करतांना माझ्या मनाची पुष्कळ एकाग्रता झाली. शेवटी तोंडामधे लाळ (पाणी) येऊन गोडवा जाणवू लागला.
४. मंत्रपठण करतांना फुलपाखरू येणे
१४.६.२०२४ या दिवशी मंत्रपठण चालू केल्यानंतर १० मिनिटांनी एक फुलपाखरू आमच्या समोरच्या आगाशीत येऊन बसले. त्याच्या पंखांची उघड-झाप होत होती. नंतर ते पंख मिटून स्थिर झाले. ते १० ते १५ मिनिटे तेथेच होते. मंत्रजप संपण्याच्या ५ मिनिटे आधी ते उडून गेले. तेव्हा ‘त्या फुलपाखरालाही चैतन्य मिळाले’, असे मला वाटले.
५. मंत्रपठण करतांना चिमणी येणे
२५.६.२०२४ या दिवशी मंत्रपठण चालू झाल्यावर १५ ते २० मिनिटानंतर एक लहान चिमणी मंत्रपठण कक्षात वेगाने आली. तिला बाहेर जाता येत नव्हते. त्यामुळे ती तेथेच डोळे मिटून शांत बसली होती. तेव्हा ‘ती एकरूप होऊन मंत्रपठण ऐकत होती’, असे मला वाटले. चिमणी मंत्रपठण संपण्याच्या ५ मिनिटे आधी उठून बाहेर गेली.
मंत्रपठण करतांना अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. जयवंत रसाळ (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |