टँकरमधून गॅसची चोरी करून काळ्या बाजारात विकणारे तिघेजण कह्यात !

तब्बल १ कोटी १० लाखांचा गॅससाठा शासनाधीन !

प्रतिकात्मक छायाचित्र

शेलपिंपळगाव – इंडियन ऑईल आस्थापनाच्या अधिकार्‍यांनी मुंबई येथून खेड तालुक्यातील रासे येथील इंडियन ऑईल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचा गॅस टँकर आणण्यासाठी नरसिंग फड आणि अमोल मुंडे यांना परिवाहक म्हणून नेमले होते. गॅसने भरलेले दोन्ही टँकर चाकण येथे घेऊन जाणे अपेक्षित असतांना त्या दोघांनी तसे न करता राजू चव्हाण यांना गॅस काढून घेण्यासाठी संमती दिली. चव्हाण यांनी चोरलेला गॅस काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवून ठेवला होता. पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षापथकाला याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत तब्बल १ कोटी १० लाख ५ सहस्र १४५ रुपये किमतीचा गॅस शासनाधीन केला. या प्रकरणी तिघांना कह्यात घेतले आहे.