वक्फ सुधारणा विधेयकावर आक्रमक होऊन रस्त्यावर उतरण्याची रझा अकादमीची धमकी !

मुंबई – आम्हाला वक्फ विधेयक मान्य नाही. या प्रकरणी आम्ही वेळ पडली, तर रस्त्यावर उतरू, तसेच सर्वाेच्च न्यायालयाचेही दार ठोठावू. ९९ टक्के मुसलमान या विधेयकामुळे अप्रसन्न झाले आहेत, ही वस्तूस्थिती आहे, अशी मुक्ताफळे रझा अकादमीने (भारतातील एक सुन्नी मुसलमान इस्लामवादी संघटना आहे, ज्याला ‘रझा अकादमी’ असे म्हणतात) या संघटनेने उधळली आहेत. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्याप्रकरणी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मान्य झाल्यावर रझा अकादमीने ३ एप्रिल या दिवशी मुंबई येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात अनेक मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आणि मुसलमान समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला कडाडून विरोध केला. (दुसर्‍या समाजातील लोकांच्या भूमी हडप करून वक्फ बोर्डाच्या नावावर त्या भूमी करून ‘लँड (भूमी) जिहाद’ करायचा हाच एक कलमी कार्यक्रम धर्मांध मुसलमान राबवत आहेत. विधेयकामुळे हे थांबणार आहे. त्यामुळेच धर्मांध मुसलमान थयथयाट करत आहेत ! – संपादक)

मौलवी खलिदी रहमान नूर म्हणाले की, वक्फ सुधारणा विधेयक मान्य झाल्यानंतर जल्लोष करणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चेतावणीवर नाचणारे आहेत. ते त्यांनी पाळलेले कुत्रे आहेत. हा आमचा धार्मिक प्रश्न आहे. (तुमचा धार्मिक प्रश्न आहे, तर तुमच्या समाजापुरता ठेवा. इतरांच्या भूमी लाटून त्यातून वक्फ बोर्ड काय साध्य करत आहे ? यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा काहीही संबंध नसतांना तिचे नाव घेणे हास्यास्पद आहे ! – संपादक) त्यासाठी आम्ही कोणतीही ‘कुर्बानी’ (बलीदान) देण्यास सिद्ध आहोत. आम्ही हे विधेयक मान्य करणार नाही. या प्रकरणी जितका विरोध असेल तितका करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा खोटारडे आहेत. (‘चोराच्या उलट्या बोंबा…’ ही म्हण सार्थ ठरवणारे मौलवी खलिदी रहमान नूर ! – संपादक) भाजपचे नेते मुलींवर सर्वाधिक अत्याचार करत आहेत. (‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदूंना मुलींचे अपहरण करून त्यांना इस्लाम पंथ स्वीकारण्यास भाग पाडणार्‍या धर्मांधांविषयी मौलवी खलिदी रहमान नूर कधी बोलतात का ? – संपादक) त्यामुळे ते जे काही बोलत आहेत ते खोटेच आहे. ते आमच्या भल्यासाठी काम करत असते, तर त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले असते. आमच्याशी संवाद साधला असता. भाजप मुसलमानांसाठी नव्हे, तर स्वतःसाठी आणि आपल्या मित्रांसाठी काम करत आहे.

महंमद सईद नुरी म्हणाले की, सरकार सांगते एक आणि करते दुसरे. आम्हाला या विधेयकावर १ टक्काही विश्वास नाही. आता वक्फच्या भूमी हडप केल्या जातील. मुसलमानांची संपत्ती सुरक्षित रहाणार नाही. मागील इतिहास पहाता आमचा या सरकारवर विश्वास नाही. आम्ही आजच्या बैठकीत सर्व कायदेशीर मार्गांवर चर्चा केली. आम्ही आमच्या संपत्तीचे संरक्षण करू.

संपादकीय भूमिका

मुंबईतील आझाद मैदानात ११ ऑगस्ट २०१२ या दिवशी झालेल्या दंगलीला १४ वर्षे झाली आहेत, तरीही रझा अकादमीसह संबंधित आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही. रझा अकादमीच्या चेतावणीकडे सरकारने दुर्लक्ष न करता तिने पुन्हा आक्रमक होऊन दंगली न घडवण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. आतापर्यंत आझाद मैदान दंगलप्रकरणी रझा अकादमीवर कठोर कारवाई झाली असती, तर या संघटनेने पुन्हा असे आक्रमक धोरण राबवण्याचे धाडस केले नसते !