पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत १ लाख ६१ सहस्र रुपये जमा !

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प येथे स्मशानभूमी आहेत. येथे विनामूल्य अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी आणि इतर ठिकाणी गुप्तदान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जनासाठी येणारे नागरिक दानपेटीत दान करतात. या पेट्या मार्चच्या शेवटी उघडण्यात येतात.

पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटीत १ लाख ६१ सहस्र ५३७ रुपये इतकी रक्कम जमा झालेली आढळून आली.  गतवर्षी हीच रक्कम २ लाख ८ सहस्र रुपये इतकी होती. स्मशानभूमीसाठी दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, नागरिक यांच्याकडून शेणी, लाकूड दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचसमवेत दानपेटीत आर्थिक रक्कम देण्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.