पणजी, ४ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात वक्फ बोर्ड किंवा अशा बोर्डाची कोणतीही मालमत्ता नाही. त्यामुळे संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यातील हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती आणि इतर सर्व धर्मीय यांनी गुण्यागोविंदाने रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.