‘विविध योगमार्गांनुसार साधना करणार्यांमध्ये भक्तीयोग आणि ज्ञानयोग हे प्रमुख योगमार्ग आहेत. या दोन्ही योगमार्गांनुसार साधना करणार्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योगमार्गानुसार अनुभूती येतात. त्याचप्रमाणे यांतील काही साधकांना त्यांच्या योगमार्गांनुसार ईश्वरप्राप्ती करण्यासाठी धर्म आणि अध्यात्म यांच्याविषयी ईश्वरीय ज्ञान मिळते. या लेखात भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्ग यांनुसार प्राप्त होणार्या ईश्वरी ज्ञानाची वैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील भेद दिले आहेत.
१. भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांनुसार ज्ञान प्राप्त होण्यातील भेद
टीप १ – सनातनमधील भक्ती आणि ज्ञान या दोन्ही मार्गांनुसार ज्ञानप्राप्त करणार्या साधकांचा ज्ञान प्राप्त केल्यामुळे अहं न वाढण्यामागील कार्यकारणभाव : भक्तीमार्गी साधकांना याची जाणीव असते की, त्यांना भगवंताच्या कृपेमुळे ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्यात ज्ञानप्राप्तीच्या कर्तेपणाची भावना अल्प असते. त्यामुळे त्यांना ज्ञानप्राप्तीचा अहं होण्याची शक्यता अल्प असते. ज्ञानमार्गी साधकांना ‘भगवंताच्या कृपेमुळे ज्ञान प्राप्त होत आहे’, ही जाणीव अल्प असल्यामुळे त्यांच्यामध्ये ज्ञानप्राप्त करण्याचा सूक्ष्म अहं जागृत होऊ शकतो. त्यामुळे त्यांना ज्ञानप्राप्तीचा अहं होण्याची शक्यता अधिक असते, उदा. महर्षि व्यासांनी वेदांचे चार भाग करून अनेक ग्रंथ लिहिले; परंतु त्यांच्यातील कर्तेपणाच्या सुप्त अहंमुळे त्यांच्या मनाला आनंद आणि शांती लाभली नाही. तेव्हा देवर्षी नारदांनी त्यांना भक्तीप्रधान असलेले ‘श्रीमद्भागवत पुराण’ लिहिण्यास सांगितले. या ग्रंथामध्ये त्यांनी श्रीविष्णू आणि त्याचे अवतार यांच्या लीलांचे सुंदर विवेचन केले आहे. भगवंताच्या लीलांचे गुणगाण करतांना त्यांच्या अंत:करणात भक्तीचा पाझर फुटला आणि त्यांच्या आनंद अन् शांती लाभली.
सनातन संस्थेतील साधक गुरुकृपायोगानुसार साधना करत असल्यामुळे सनातन संस्थेमधील भक्ती आणि ज्ञान या दोन्ही मार्गांनुसार ज्ञानप्राप्त करणार्या साधकांवर असणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे त्यांचा अहं वाढत नाही.
टीप २ – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर : या पूर्वी सूक्ष्म परीक्षण करत होत्या. त्यांचा साधनामार्ग भक्तीमार्गी असल्यामुळे त्यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण भक्तीमय होते.
टीप ३ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु डॉ. वसंत आठवले, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. अनंत आठवले, पू. (सौ.) योया वाले, श्री. निषाद देशमुख, श्री. राम होनप आणि कु. प्रियांका लोटलीकर (आताच्या सौ. प्रियांका सुयश गाडगीळ)
२. भगवंताने भक्ती आणि ज्ञान या दोन्ही योगमार्गांनुसार ज्ञान देण्यामागील कार्यकारणभाव
साधना करणार्या साधकांचा प्रामुख्याने भक्तीमार्ग किंवा ज्ञानमार्ग असतो. या दोन्ही मार्गांनी साधना करणार्या साधकांना त्यांची पुढील साधना चांगली होण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन श्रीगुरु करत असतात. श्रीगुरूंच्याच कृपेमुळे काही भक्तीमार्गी आणि काही ज्ञानमार्गी साधकांना ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक असणारे धर्म अन् अध्यात्म यांचे ईश्वरी ज्ञान प्राप्त होत आहे. हे ज्ञान अत्यंत दुर्मिळ असून ते वेद आणि उपनिषदे यांच्यातील ज्ञानाप्रमाणे गूढ आहे. पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी अवतरलेले श्रीविष्णूचे अंशावतार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या ज्ञानशक्तीमुळे सनातनच्या काही साधकांना भक्ती आणि ज्ञान या दोन्ही योगमार्गांनुसार ईश्वरी ज्ञान प्राप्त होत आहे. भगवंताचा ‘ज्ञानावतार’ हा ज्ञानाचे प्रेरणास्रोत आणि ज्ञानाचे संकलक असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले अन् ज्ञानप्राप्तकर्ते असलेले सनातनचे साधक यांच्या माध्यमातून कार्यरत झालेला आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०२१)