देवगड – सध्या धर्मांधांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल प्रमाणित’ असण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धर्मांधांकडून आता धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी उत्पादनांसाठीही केली जात आहे. या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्य धर्मांधांची बहुसंख्यांकांवर एक प्रकारची हुकूमशाहीच चालू आहे. त्यामुळे ‘धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्यात यावी’, अशी मागणी देवगड तालुका सुवर्णकार संघटनेने निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे. याविषयी देशाचे गृहमंत्री, गृहमंत्रालयाचे सचिव, देशाचे व्यापार आणि व्यवसायमंत्री अन् सचिव यांना द्यायचे निवेदन तालुका सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकार्यांनी देवगडचे तहसीलदार मारुति नाना कांबळे यांना दिले. या वेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष श्री. महेश घारे, उपाध्यक्ष श्री. विवेक मोंडकर, सहसचिव श्री. संदीप तळवडेकर, सुवर्णकार श्री. संदीप कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद मोंडकर, श्री. अशोक करंगुटकर आदी उपस्थित होते.
सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय
१. श्री. महेश घारे, अध्यक्ष, सुवर्णकार संघटना – सर्व हिंदूंनी एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे. असे नाही झाले, तर काही वर्षांनी हिंदू अल्पसंख्यांक होतील, याचे गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे. अशा कार्यामध्ये मी सहभागी आहे.
२. श्री. विवेक मोंडकर, उपाध्यक्ष, सुवर्णकार संघटना – हे निवेदन देण्यासाठी मी सहभागी झालो, याचा मला आनंद वाटला. यामुळे समाजामध्ये पुष्कळ जागृती होणार आहे. अशा धर्माच्या कार्यामध्ये सहभागी होण्यास मी सदैव सिद्ध आहे.
३. श्री. संदीप तळवडेकर, सहसचिव, सुवर्णकार संघटना – धर्मकार्यासाठी हिंदूंनी जागे होणे पुष्कळ आवश्यक आहे. अशी षड्यंत्रे हाणून पाडणे, ही काळाची आवश्यकता आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामुळेच हे जनजागृतीचे कार्य चालू आहे. अशा या पवित्र कार्यामध्ये मी सहभागी आहे.
४. श्री. संदीप कुलकर्णी, सुवर्णकार – या विषयाचा प्रसार होणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. यासाठी मी अधिकाधिक प्रसार करण्यासाठी प्रयत्न करीन.