नागपूर – विदर्भातील भाजपचे नेते छोटू उपाख्य रवींद्र भोयर यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षावर अप्रसन्न होते. ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशही करणार आहेत. ‘भाजपसाठी ३४ वर्षांपासून झटत आलो; पण त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला दाबण्यात आले. त्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.