आज मुंबई येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तथाकथित क्षमापत्रे : आक्षेप आणि वास्तव’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा !

मुंबई – सावरकरदर्शन प्रतिष्ठानच्या वतीने १९ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, चंचल स्मृती, वडाळा, मुंबई येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तथाकथित क्षमापत्रे : आक्षेप आणि वास्तव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. रवींद्र साठे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. वैभव पुरंदरे (वरिष्ठ संपादक, टाईम्स ऑफ इंडिया आणि सावरकर चरित्र लेखक) उपस्थित असतील. कोरोना प्रतिबंधक सर्व शासकीय नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.