भारताच्या शत्रूने भारताचा खोटा इतिहास लिहिणे आणि मेकॉलेच्या मानसपुत्रांमुळे आजही तोच इतिहास शिकवला जाणे

‘जगातील बरेचसे देश कधी ना कधी पारतंत्र्यात होते; परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांनी त्यांचा इतिहास त्यांच्या दृष्टीने लिहिला. याला एकमात्र अपवाद भारत देश आहे. आजही देशाच्या शत्रूंनी लिहिलेला देशाच्या शत्रूंचा इतिहास आपल्याला शिकवला जातो. जर्मनीचे एक विद्वान पॉक हैमर यांनी भारताचा प्रचलित इतिहास वाचून भारतावर लिहिलेल्या ‘इंडिया : रोड टू नेशनहुड’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे, ‘जेव्हा मी भारताचा इतिहास वाचतो, तेव्हा मला वाटत नाही की, तो भारताचा इतिहास आहे. हा तर भारताला लुबाडणार्‍या आणि हत्याकांडे करण्यार्‍या आक्रमकांचा इतिहास आहे, असे वाटते. ज्या दिवशी भारतियांना सत्य इतिहास समजेल, त्या दिवशी ते जगाला दाखवून देतील की, ते कोण आहोत. अनेक दशकांच्या श्रमानंतर विदेशी शक्तींनी भारताचा खोटा इतिहास लिहून घेतला आणि तो मेकॉलेच्या मानसपुत्रांच्या साहाय्याने आजही भारतात शिकवला जात आहे.’

– श्री. सतीश त्रिपाठी (एप्रिल २०१२)