पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अडीच सहस्र ठेवीदारांच्या ४९ कोटी रुपयांच्या ठेवी परत केल्या आहेत; तर उर्वरित ठेवीदारांना येत्या २ मासांत टप्प्याटप्प्याने ठेवी वितरीत करणार आहे, अशी माहिती शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे अवसायक डॉ. आर्.एस्. धोंडकर यांनी दिली.
(सौजन्य : Zee 24 Taas)
रिझर्व बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लावल्याने ठेवीदारांना खात्यातून १ सहस्त्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर मर्यादा आल्या होत्या. ठेव विमा महामंडळाकडून निधी प्राप्त झाल्याने या बँकेतील ठेवीदारांच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात येत आहेत. ज्या ठेवीदारांनी बँकेच्या शाखेत केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज जमा केला नाही त्यांनी अर्जासमवेत आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन अवसायकांनी केले आहे.