मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडून सनातनचे आपत्काळाविषयीचे दोन ग्रंथ भेट !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सनातन संस्थेचे आपत्काळाविषयीचे ग्रंथ देतांना प्रीतम नाचणकर

मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांनी दीपावलीनिमित्त सनातनचे शुभेच्छापत्र, तसेच सनातनचे ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’ आणि ‘आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता करा !’ हे दोन ग्रंथ मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी हे ग्रंथ हातात घेऊन त्यांची मुखपृष्ठे न्याहाळली.

‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’, या ग्रंथात आपत्काळ म्हणजे काय ?, त्याविषयी संत आणि द्रष्टे अन् संत यांनी वर्तवलेली भाकिते, आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता आदी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यासह ‘आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता करा !’, या ग्रंथात आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता कशी करावी’, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

दीपावलीनिमित्त १ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी निमंत्रित केले होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व पत्रकारांंना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या.

या प्रसंगी श्री. नाचणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मीताई ठाकरे यांनाही सनातनचे शुभेच्छापत्र देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.