१. ‘मी पुण्यामध्ये नोकरी करते. कार्यालयात प्रलंबित कामे बरीच असल्याने इतरांना सुट्टी देत नाहीत; पण रामनाथी आश्रमात जाण्याच्या कालावधीत मला सहजतेने सुटी मिळाली.
२. आश्रमात गेल्यावर ‘माझा जडपणा निघून गेला आणि माझे पूर्ण शरीर हलके झाले, तसेच माझे मनही उत्साही झाले.
३. मी नेहमी लवकर उठत नाही; पण रामनाथी आश्रमात असतांना मला देवच जागे करत होता. त्यामुळे मला पहाटे ४ वाजताच जाग येत असे.
४. आश्रमात माझा नामजप छान व्हायचा. त्यामुळे मला ‘कधी एकदा नामजप करायला बसते’, असे वाटायचे.
५. ‘आश्रमात भगवंत वावरत आहे’, असे मला सतत वाटत होते.’
– सौ. नम्रता संभाजी पवार, चंदननगर, पुणे. (२७.७.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |