‘मार्च २०२० मध्ये मला रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. आश्रमात जायचे ठरल्यावर माझ्यासमोर प्रवासासाठी होणार्या व्ययाची समस्या होती. तेव्हा माझ्याकडे काही रुपये असल्याचे मला आठवले, जे मी व्यय केले नव्हते. ‘ते अर्पण करावे’, या विचारांनी मी तसेच ठेवले होते. ते पैसे मला मालकांनी दिवाळीनिमित्त भेट दिले होते. प्रत्यक्षात दिवाळीत मी चाकरीच्या ठिकाणी गेलो नव्हतो आणि अपेक्षित कामही केले नव्हते. त्यामुळे ‘माझ्या मनात मालकांनी काही भेट द्यावी’, असा विचार नव्हता. दिवाळीनंतर मी कामावर गेलो. तेव्हा मालकांनी स्वतःहून मला पारितोषिक दिले. ‘४ मासांनंतर आश्रमात जाण्याआधीच भगवंताने हे पारितोषिक मला देऊन ठेवले होते’, असे मला वाटले. भूलोकीच्या वैकुंठभूमीचे दर्शन घेण्याची या भक्ताची इच्छा पूर्ण झाली. यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शांताराम बेदरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), नांदेड (सप्टेंबर २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |