रामनाथी आश्रमात जातांना आणि आश्रम दर्शनाच्या वेळी ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. संघवी सचिन तांबे (वय १२ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

१. रामनाथी आश्रमात जाण्यासाठी आगगाडीत बसल्यावर आश्रमाविषयी मनात कुतूहल निर्माण होणे

‘रामनाथी आश्रमात जाण्यासाठी आम्ही सगळे जण आगगाडीमध्ये बसलो. तेव्हा मला वाटले, ‘आश्रम कसा असेल ? केवढा असेल ?’ हे प्रश्न पडल्यानंतर ‘मी कधी एकदा रामनाथी आश्रमात जाते आणि तेथील संतांना भेटते’ याची मला उत्सुकता वाटू लागली.

कु. संघवी तांबे

२. आम्ही आश्रमात आल्यावर तेथील चैतन्याने मी सगळे विसरले.

३. आश्रमात आल्यावर मला एकदम प्रसन्न वाटले.

४. आश्रमातील भिंत हालत असल्याचे जाणवणे

आश्रमातील भिंतीला हात लावून मन भिंतीवर एकाग्र केले. तेव्हा ती भिंत हालत असल्याचे जाणवले.

५. एका संतांशी  बोलत असतांना भाव जागृत होणे

मी एका संतांना भेटण्यासाठी गेले होते. ते माझ्याशी बोलत असतांना माझ्या डोळ्यांतून अश्रू आले.

६. ‘जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी आश्रमात येऊन सेवा करीन’, असा निश्चय केला.’

– कु. संघवी सचिन तांबे (वय १२ वर्षे), चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (२५.१.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक