इस्लाम स्वीकारा किंवा अफगाणिस्तान सोडा ! – तालिबान्यांकडून शिखांना धमक्या

खलिस्तानवादी याविषयी का बोलत नाहीत ? कि त्यांना पाक आणि अफगाणिस्तान येथे शिखांवर केले जाणारे अत्याचार मान्य आहेत ? – संपादक

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा, अशा धमक्या देण्यात आल्याचे ‘इंटरनॅशनल फोरम फॉर राईट्स अँड सेक्युरिटी’च्या  अहवालातून समोर आले आहे.