‘सीमा सुरक्षा दलाचे एक सैनिक मोहनसिंह सुनेर २९ वर्षांपूर्वी हुतात्मा झाले होते. या हुतात्म्याचे कुटुंब झोपडीत आपले जीवन कंठत होते. जेव्हा बेटमाच्या (मध्यप्रदेश) पीर पीपल्या गावातील युवकांना हे समजले, तेव्हा त्यांनी एक अभियान चालू केले आणि पहाता पहाता अर्पणाच्या रूपात ११ लाख रुपयांची रक्कम गोळा केली. मोहनसिंह सीमा सुरक्षा दलामध्ये (‘बी.एस्.एफ्.’मध्ये) सैनिक होते. आसाममधील स्थलांतराच्या (पोस्टिंग) काळात ३१.१२.१९९२ या दिवशी ते हुतात्मा झाले. तेव्हापासून त्यांचे कुटुंब कच्च्या झोपडीत रहात होते. मोहनसिंह सुनेर जेव्हा हुतात्मा झाले होते, त्या वेळी त्यांना ३ वर्षांचा एक मुलगा होता आणि त्यांची पत्नी राजूबाई चार मासांची गर्भवती होती. नंतर दुसर्या मुलाचा जन्म झाला. पतीच्या निधनानंतर दोन मुलांचे पालन-पोषण करण्यासाठी त्यांच्या पत्नीला पुष्कळ काबाडकष्ट करावे लागले. ते कुटुंब झोपडीमध्येच रहात होते. तुटके-फुटके छत आणि बांबू-काठ्यांच्या आधारे कशीबशी त्यांची झोपडी उभी होती. हे दुर्दैवच म्हटले पाहिजे की, या कुटुंबाला आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही.’ (याविषयी तथाकथित पुरोगामी, सर्वधर्मसमभाववाले आणि निधर्मी काही बोलतील का ? – संपादक)
(साभार : मासिक ‘प्रभात संस्कृति मंच’ आणि ‘अक्षर प्रभात’)