‘एखाद्या भाषेतील साहित्य ‘अभिजात’ ठरते आणि एखादी भाषा मृतप्राय होऊ लागते. यामागे भाषिक कारणेच आहेत कि लष्करी शक्ती, राजकीय सामर्थ्य, आर्थिक सत्ता यांच्या बळावर भाषा पुढे किंवा मागे जातात ?
‘भाषेने टिकण्यासाठी ‘विस्तारवादी’ झाले पाहिजे’, हे ‘भाषा वसुधा परिषदे’त सांगतांना साहित्यिक श्री. भालचंद्र नेमाडे यांनी ‘लष्करी, आर्थिक आणि राजकीय शक्तीच अशा विस्ताराला कारणीभूत ठरली आहेत’, याची उदाहरणे दिली. ‘आज आपापली भाषा (मातृभाषा) वाचवायची असेल, तर केवळ आपल्याच भाषेत (मातृभाषेत) बोलणे, हाही जालीम उपाय असू शकतो’, अशी भूमिकाही त्यांनी इंग्रजी भाषणात मांडली.’
– श्री. भालचंद्र नेमाडे (साभार : ‘लोकसत्ता’, ८.१.२०१२)