असे लाचखोर लोकप्रतिनिधी असणारे पक्ष काय कामाचे ? – संपादक
ठाणे, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – भिवंडी येथील अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ठरलेली ५० लाख रुपयांची लाचेची रक्कम घेतांना भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना पद्मानगर भाजी मंडई भागात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले आहे.
भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला शेतकर्यांच्या हितासाठी जागा देण्यात आली होती; परंतु या जागेवर ६७ व्यावसायिक गाळे उभारण्यात आले. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी कामूर्ती यांनी महानगरपालिका आणि महसूल विभाग यांच्याकडे केली होती. ही कारवाई न करण्यासाठी संबंधितांकडून लाच घेण्यात आली होती. (स्वतःच्या लाभासाठी कायद्याचा वापर करणारे लोकप्रतिनिधी जनतेला न्यायाचे राज्य देतील का ? – संपादक)