५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. रिद्धेश माणिक खटावकर (वय १ वर्ष) !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. रिद्धेश माणिक खटावकर हा एक आहे !

आश्विन शुक्ल पक्ष चतुर्थी (९.१०.२०२१) या दिवशी घाटकोपर, मुंबई येथील चि. रिद्धेश माणिक खटावकर याचा प्रथम वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि त्याची आई अन् आजी-आजोबा यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. रिद्धेश माणिक खटावकर

चि. रिद्धेश माणिक खटावकर याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !  

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

१. गर्भारपण

१ अ. प्रतिदिन स्तोत्रे ऐकणे : ‘मी गरोदरपणी प्रतिदिन सकाळी उठल्यानंतर श्रीकृष्णाला प्रार्थना करायचे, तसेच श्रीरामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र आणि श्री गणपति अथर्वशीर्ष ऐकायचे.

सौ. नूतन खटावकर

१ आ. धर्माचरणाच्या कृती करणे : ‘ऑनलाईन’ सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी धर्माचरणाच्या कृती करायचे. सत्संग ऐकतांना मला पुष्कळ चांगले आणि प्रसन्न वाटायचे.

१ इ. कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीतीदायक परिस्थिती असतांना स्थिर राहून नामजपादी उपाय करणे : मी पाचव्या मासात माहेरी पंढरपूरला गेले. (त्या वेळी माझे आई-वडील पंढरपूर येथे रहात होते. आता ते सोलापूरला रहातात.) तेव्हा कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीतीदायक स्थिती होती; पण गुरुदेवांच्या कृपेमुळे मी स्थिर राहून नामजपादी उपाय करू शकले.

१ ई. मंत्रजप करतांना पोटातील बाळाची हालचाल जाणवणे : माहेरी आम्ही सर्व जण ‘कोरोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती आणि आध्यात्मिक बळ वाढावे’, यासाठी सांगितलेला मंत्रजप रात्री एकत्र बसून करायचो. तेव्हा मला पोटातील बाळाची हालचाल पुष्कळ प्रमाणात जाणवायची.’

(‘कोरोना महामारीच्या विरोधात आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी नामजपादी उपाय म्हणून साधक ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप प्रतिदिन १०८ वेळा करतात.’ – संकलक)

– सौ. नूतन माणिक खटावकर (चि. रिद्धेशची आई), घाटकोपर, मुंबई. (२१.७.२०२१)

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते ५ मास

श्री. काशिनाथ व्हनमारे

२ अ १. बाळाच्या दोन्ही भुवयांच्या मधे ‘ॐ’ चा आकार दिसणे : ‘बाळाच्या जन्मानंतर मला आणि माझ्या लहान मुलाला (श्री. अक्षय व्हनमारे यांना) बाळाच्या दोन्ही भुवयांच्या मधे ‘ॐ’ चा आकार दिसला.’ – सौ. पद्मावती व्हनमारे (चि. रिद्धेशची आजी (चि. रिद्धेशच्या आईची आई)), सोलापूर (जुलै २०२१)

२ अ २. बाळ रडत असतांना भ्रमणभाषवर मंत्रजप लावल्यावर बाळाने शांतपणे मंत्रजप ऐकणे : ‘जन्मानंतर तिसर्‍या दिवशी बाळ अतिशय मोठ्याने रडू लागले; म्हणून मी भ्रमणभाषवर मंत्रजप लावला. त्या वेळी बाळ शांतपणे मंत्रजप ऐकू लागले आणि हसू लागले. मंत्रजप ऐकतांना बाळाने हाताच्या बोटांची मुद्रा केली होती.’

– श्री. काशिनाथ व्हनमारे (चि. रिद्धेशचे आजोबा (रिद्धेशच्या आईचे वडील)), सोलापूर (जुलै २०२१)

२ अ ३. बाळाने विविध मुद्रा करणे : ‘झोपेत असतांना बाळ हाताच्या बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा करायचे. ‘१.१०.२०२० या दिवशी रात्री बाळ झोपलेले असतांना भ्रमणभाषवर नामजप लावला होता. तेव्हा त्याच्या हाताच्या बोटांची ध्यानमुद्रा होती.

२ अ ४. बाळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून पुष्कळ हसायचे आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे.

२ अ ५. रिद्धेशने ‘ॐ’ म्हणायचा प्रयत्न करणे : रिद्धेश त्याच्या आजोबांच्या समवेत असतांना पुष्कळ आनंदी असायचा. त्याचे आजोबा त्याला ‘ॐ’ म्हणून दाखवायचे. तेव्हा रिद्धेशही त्याच्या भाषेत ‘ॐ’ म्हणायचा प्रयत्न करायचा.

२ आ. वय – ६ ते १० मास

सौ. पद्मावती व्हनमारे

२ आ १. नामजप आणि कापूर अन् अत्तर यांचे उपाय केल्यामुळे रिद्धेशचा आध्यात्मिक त्रास न्यून होणे : एकदा रिद्धेश रात्री २ – ३ वेळा झोपेतून रडत उठला. नंतर भ्रमणभाषवर नामजप लावल्यावर तो लगेच झोपला. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याचे अंग पुसून मी कापूर आणि अत्तर लावले. त्यानंतर तो पुष्कळ मोठ्याने हसत होता. त्या वेळी त्याच्याकडे पाहून पुष्कळ प्रसन्न वाटत होते.

२ आ २. मावसबहीण चि. ईश्वरी खाडे (वय ३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हिचा आवाज ऐकल्यावर रिद्धेशचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याचे रडणे बंद होणे : कधी कधी रिद्धेश रात्री १२ वाजता रडत उठायचा. त्या वेळी ‘काय करावे ?’, हे आम्हाला कळायचे नाही. भ्रमणभाषवर नामजप लावला, तरी तो शांत व्हायचा नाही. त्या वेळी आम्ही रिद्धेशची मावसबहीण काळेवाडी, (दौंड, पुणे) येथील चि. ईश्वरी खाडे हिला भ्रमणभाष करायचो. तिचा आवाज ऐकला की, रिद्धेश शांत व्हायचा.

२ आ ३. चलच्चित्रांत परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले की, रिद्धेशला पुष्कळ आनंद होणे : रिद्धेशला जेवण भरवतांना आम्ही त्याला देवाची आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने बनवण्यात आलेली चलच्चित्रे (व्हिडिओ) दाखवतो. त्या चलच्चित्रांत त्याला परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले की, रिद्धेश पुष्कळ हसतो आणि आनंदाने जोरात ओरडतो. त्या वेळी ‘जणू त्याला परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायचे आहे’, असे वाटते.

३. स्वभावदोष : चिडचिड करणे.

‘हे श्रीकृष्णा, या दैवी बालकाची गुणवैशिष्ट्ये तू माझ्याकडून लिहून घेतलीस’, याबद्दल मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. नूतन माणिक खटावकर (चि. रिद्धेशची आई), घाटकोपर, मुंबई. (२१.७.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता