‘समाजातील व्यक्तींना श्राद्धविधींचे महत्त्व कळावे’, यासाठी सनातन संस्थेने ‘श्राद्धविधी’ या नावाचे एक ‘ॲप’ बनवले आणि ते ‘डाऊनलोड’ करायला समाजातील व्यक्तींना आवाहन केले आहे. समाजातील व्यक्तींकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ‘हे ॲप ‘डाऊनलोड’ करून समाजातील हिंदू श्राद्धपक्ष करत आहेत’, असे लक्षात आले.
हे पाहिल्यावर माझ्या मनात विचार आले, ‘आतापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘त्यांच्या पूर्वजांना गती मिळावी’, यासाठी श्राद्धविधी करायला सांगितले. त्यामुळे पूर्वजांच्या त्रासामुळे साधकांच्या साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधक निर्विघ्नपणे साधना करत आहेत. आता निर्मिलेल्या या ‘ॲप’मुळे समाजातील हिंदू श्राद्धपक्ष शास्त्रानुसार करायला लागतील. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांना गती मिळून समस्त हिंदूंच्या धर्मकार्यातील अडथळे दूर होण्यासाठी साहाय्य होणार आहे. समाजातील हिंदू साधना करायला लागतील अन् त्यांचा धर्मकार्यातील सहभाग निश्चितच वाढेल.’
‘समाजातील व्यक्तींच्या पूर्वजांना गती मिळावी’, याची काळजी घेणार्या गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. ‘गुरुमाऊलीनेच हा विचार दिला आणि लिहूनही घेतला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. नीलेश टवलारे, अमरावती (९.९.२०२०)