शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी विद्यार्थ्याने काचेच्या दरवाज्यावर डोके आपटले !

समस्येला स्थिरपणे सामोरे जाण्याचे धैर्य आणि संयम निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मबळ वाढण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

पिंपरी (पुणे) – महाविद्यालयाने शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी करत विद्यार्थ्याने प्राचार्य कक्षेच्या काचेवर डोके आपटले. त्यामुळे दरवाजाची काच फुटून विद्यार्थ्यासह महाविद्यालयातील कर्मचारी सुरेश देसाई हे घायाळ झाले आहेत. ही घटना रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरीगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये २९ सप्टेंबर या दिवशी दुपारी घडली. संबंधित विद्यार्थी आणि प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्यामध्ये शुल्क माफीवरून झालेल्या वादातून विद्यार्थ्याने स्वत:चे डोके काचेवर आपटून काच फोडली, तसेच काचेचा तुकडा घेऊन बाहेर गेला. काही अपप्रकार घडू नये; म्हणून महाविद्यालयातील कर्मचार्‍यांनी त्याला पोलिसांच्या कह्यात दिले. संबंधित विद्यार्थ्याला शिक्षक आणि कर्मचारी यांनी कोणतीही मारहाण केली नसल्याचे महाविद्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.