मुंबई – राज्यातील धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून चालू करण्यास राज्यशासनाकडून अनुमती देण्यात आली आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील धार्मिक स्थळे ५० टक्के क्षमतेने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये मागील २४ घंट्यांमध्ये कोरोनाबाधित ४१८ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे मुंबईतील प्रमाण ९७ टक्के इतके आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचे ४ सहस्र ८१० रुग्ण आहेत.