मुंबईत रेल्वे रूळ ओलांडताना २ सहस्र ६७५ जणांचा मृत्यू !

मुंबई – मुंबईत रेल्वे रूळ ओलांडताना वर्ष २०१९ पासून आतापर्यंत २ सहस्र ६७५ जणांचा मृत्यू झाला, याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. हे अपघात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने पादचारी पूल उभारण्यावर भर देण्यात आला आहे.

१. पश्चिम रेल्वेवर ५ आणि मध्य रेल्वेवर ४ पादचारी पूल उभारले आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मध्य आणि पश्चिम रेल्वे यांनी रूळ ओलांडणार्‍यांना प्रतिबंध बसावा, यासाठी रूळांशेजारी संरक्षक भिंत बांधणे, दोन रुळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे, प्रवेशद्वार बांधणे असे काम केले आहे.

२. एम्युटीपी-३ अंतर्गत एकूण २५ पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. यात मध्य रेल्वेनेही पूल उभारणीसाठी साहाय्य केले आहे.

३. दोन स्थानकांदरम्यान प्रथम बारा ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. यात पश्चिम रेल्वेवरील माहीम ते माटुंगा, वांद्रे ते खार, विलेपार्ले ते अंधेरी, जोगेश्वरी ते गोरेगाव, वसई ते नालासोपारा दरम्यान पूल उभारले आहेत. मध्य रेल्वेवरील कळवा ते मुंब्रा, दिवा जंक्शन जवळ इत्यादी पुलांची कामे पूर्ण झाली आहेत.