धर्मनिरपेक्षतेची माळा जपणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे ! – मदन गुप्ता, संस्थापक अध्यक्ष, ऋषिजीवन समाज

आम्हाला खर्‍या अर्थाने वर्ष २०१४ मध्ये (केंद्रामध्ये भाजपचे सरकार आले) स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणणे चुकीचे होणार नाही; कारण तोपर्यंत परकीय मानसिकता ठेवणार्‍या (काँग्रेसचे सरकार असल्याने) लोकांनीच भारतावर राज्य केले आहे. रझाकारांनी घरातील लोकांच्या डोळ्यांदेखत महिलांवर अत्याचार केले होते. त्यांना विवस्त्र होऊन ‘बतुकम्मा’ (सांप्रदायिक नृत्य) करण्यास भाग पाडले होते. धर्मांधांचे ध्येय तेव्हाही स्पष्ट होते आणि आजही स्पष्ट आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची माळा जपणार्‍या आणि ‘हिंदू-मुसलमान भाई-भाई’ म्हणणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.