आलिया भट्ट आणि संबंधित यांच्यावर मुंबई येथील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार !

‘मान्यवर’ जाहिरातीतून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण

आलिया भट्ट

मुंबई – ‘मान्यवर’ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या माध्यमांतून देशभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर या दिवशी येथील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आलिया भट्ट, ‘मान्यवर मोहे’ जाहिरातदार, वेदांत फॅशन लिमिटेडचे वेदांत मोदी, श्रेयांश इनोव्हेशनचे श्रेयांश बईड यांच्या विरोधात ‘लोक क्रांती सामाजिक संस्था’ या संघटनेने तक्रार दिली आहे.

हिंदु विवाह पद्धतीमधील ‘कन्यादान’ या संज्ञेला चुकीच्या अर्थाने दाखवत प्रतिगामी म्हणण्यात आले. यामुळे हिदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, संबंधितांवर  भा.द.वि कलम ६६ (माहिती तंत्रज्ञान कायदा), कलम १५३ अ आणि ब (विविध जात, धर्म, पंथ, भाषा यांच्याशी संबंधित नागरिकांमध्ये एकमेकांविरोधात शत्रुत्व पसरवून भारतीय सार्वभौमतेला हानी पोचवणे), कलम ५०५ (समाजात अशांती निर्माण होईल, अशी भाषणे करणे), कलम २९५ अ (विशिष्ट समाजाच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावणे) या कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या जाहिरातीच्या विरोधात हिंदू अतिशय संतप्त झाले असून अनेक हिंदू मिळेल त्या माध्यमांतून या जाहिरातीचा निषेध करत आहेत.