परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या पृष्ठसंरचनेच्या संदर्भातील चुका

संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले

‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’

दैनिक ‘सनातन प्रभात’ची पृष्ठसंरचना करतांना लिखाणाची सलगता टिकवून ठेवणे, आवश्यक ते लिखाण चौकटींमध्ये उठावदार घेऊन त्याचे गांभीर्य वाचकांच्या लक्षात आणून देणे, लिखाण वाचनीय होण्यासाठी अक्षरांचा आकार, त्यांचे वळणे आदी सूत्रांचाही विचार केला जातो. या सर्व सूत्रांचा केंद्रबिंदू अधिकाधिक सात्त्विक स्पंदने निर्माण होऊन वाचकांना त्याचा लाभ व्हावा, असाच असतो. लिखाणात वापरली जाणारी विविध चिन्हे, चित्रे यांचा सात्त्विकतेच्या दृष्टीने कसा अभ्यास करावा, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला शिकवले. मथळे, लेख, काव्य यांची रचना सात्त्विक दिसावी, यासाठी अभ्यास करवून घेऊन काही निकष ठरवून दिले. यासंदर्भात त्यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले असूनही आमच्याकडून झालेल्या चुका येथे उदाहरणादाखल प्रसिद्ध करत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/513091.html

– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके (२२.९.२०२१)