इतरांनी पालटण्याचा आग्रह सोडून स्वतःला पालटून ती परिस्थिती स्वीकारणे, हाच अनेक अडचणींवर योग्य उपाय !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘कुटुंबातील सदस्य, कार्यालयातील सहकर्मचारी यांच्या स्वभावदोषांमुळे अनेक जण त्रस्त असतात. ‘इतरांनी पालटावे’, यासाठी काही जण पुष्कळ प्रयत्न करतात; परंतु इतरांमध्ये पालट न होता, स्वतःलाच मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. येथे लक्षात घेतले पाहिजे की, आपण कुणालाच अगदी स्वतःची पत्नी आणि मुले यांनाही पालटू शकत नाही; म्हणून परिस्थिती पालटण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला पालटून परिस्थिती स्वीकारायला शिकले पाहिजे. त्याने त्रास लवकर दूर होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  (१७.८.२०२१)