सर्वधर्मसमभावाच्या गुंगीमध्ये असलेल्या हिंदूंचा घात करण्यास टपलेले धर्मांध आणि मिशनरी !

‘आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री के. नारायण स्वामी हे वैकुंठ एकादशीच्या दिवशी तिरुपतीच्या बालाजी मंदिरातून बाहेर येऊन लोकांना ‘मेरी ख्रिसमस’ म्हणतात, तेव्हा अनेक प्रश्न उभे रहातात. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये चालू असलेले धर्मांतर, ईशान्य भारतामध्ये जवळपास पूर्ण झालेले ख्रिस्तीकरण, मुसलमानांची वाढत असलेली लोकसंख्या आणि तुलनेने अल्प होत असलेली हिंदूंची लोकसंख्या, हे पुष्कळ मोठे आव्हान सध्या आपल्यासमोर आहे. दबक्या आवाजात असाही स्वर ऐकायला मिळतो, ‘तुम्ही श्रीराममंदिर बांधा; पण पुढच्या ५० ते १०० वर्षांत भारतात हिंदु अल्पसंख्य होतील. आम्ही उरलेली सर्व मंदिरे पाडून टाकू.’ हा हिंदुविरोधी शक्तींचा पुष्कळ मोठा कट आहे आणि या कटातून जर हिंदु धर्माला सुरक्षित बाहेर पडायचे असेल, तर ज्या मिशनरी मानसिकतेतून ख्रिस्ती धर्मगुरु विश्वातील कुठल्याही कोपर्‍यात जाऊन धर्मप्रचार करायला सिद्ध असतो, तेवढ्याच कट्टर आणि समर्पित चित्ताने हिंदु धर्माचा प्रचार करू शकणारा एक नवा वर्ग आपण उभा केला पाहिजे. इतिहासामध्ये आद्यशंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदासस्वामी, बंगालमधील चैतन्य महाप्रभु, स्वामी विवेकानंद आणि आर्य समाजातील श्रद्धानंद आदी मंडळींचा आदर्श आपल्यासमोर आहे.

‘स्वराज्य’ नावाच्या मासिकामध्ये लेखक आर्. जगन्नाथ यांचा लेख नुकताच वाचनात आला. त्यामध्ये दिलेली काही महत्त्वाची सूत्रे वाचण्यासारखी आहेत.

१. बहुसंख्य हिंदु स्वत:ला ‘ओपन’ (मोकळे) आणि ‘लिबरल’ (स्वतंत्र विचाराचे) आहोत’, असे सांगण्यात मोठे भूषणावह मानतात; मात्र पश्चिम उत्तरप्रदेश, आसाम, बंगाल आणि कर्नाटक येथे अल्पसंख्यांकांच्या वाढत्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष होते. दक्षिणेतील ख्रिस्त्यांचा विस्तार आणि अन्य ठिकाणी चालू असलेले धर्मांतर आपण दुर्लक्षित करतो.

२. केवळ हिंदु धर्मामध्येच विश्वकल्याणाची संकल्पना

येथील बहुसंख्य हिंदु समाज ‘सर्व धर्म हे सारखेच आहेत’, असे मानतो की, जे धादांत खोटे आहे. ‘धर्म’, ‘रिलिजन’ आणि ‘मजहब’ यांमध्ये जमीन-आसमानाचा भेद आहे. केवळ हिंदु धर्मामध्येच विश्वकल्याणाची संकल्पना असून इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हा केवळ त्यांच्या धर्मियांमध्येच कल्याणाची इच्छा करतो. ‘ला इलाहा इल्लला’ (अल्लाखेरीज दुसरा कोणताही देव नाही) या ओळीचा अर्थ मुळात एकेश्वरवाद सांगतो. ‘आमचा तो धर्म खरा, आमचा तो देव खरा, बाकीच्यांना जगण्याचा अधिकारच नाही’, असा विचार अन्य धर्मियांमध्ये आहे. ‘काफीर’ आणि ‘मूर्तीपूजक’ अशा संज्ञा देऊन हिंदूंना मोगल काळात हिणवले जात असे.

३. ख्रिस्त्यांची क्लृप्ती

ख्रिस्त्यांची लोकसंख्या मात्र जनगणनेतून कळणार नाही; कारण ‘क्रिप्टो ख्रिश्चन’ अशी एक नवी प्रजाती सध्या आपल्याला पहायला मिळते. याचा अर्थ असा की, नाव पालटायचे नाही; मात्र मनातून ख्रिस्ती धर्माचा अवलंब करायचा. उदाहरणार्थ आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी असून नावावरून ते हिंदू वाटतात; मात्र ते ख्रिस्ती आहेत.

४. पुरोगामी विचारवंत आणि साम्यवादी यांच्याकडून केला जाणारा बुद्धीभेद

सध्या पुरोगामी विचारवंत आणि साम्यवादी विचारसरणीचे तथाकथित विद्वान ‘हिंदु धर्म’ आणि ‘हिंदुत्व’ अशा दोन वेगवेगळ्या संकल्पना मोठ्या चपखलपणे वापरून बहुसंख्य हिंदूंचा बुद्धीभेद करत आहेत. ‘हिंदु धर्म हा महान असून हिंदुत्व म्हणजे वाईट आहे’, असा प्रचार सध्या चालू आहे. दुर्दैव म्हणजे बहुसंख्य हिंदूंना एकतर धर्मशिक्षणाची आवश्यकता असून वैचारिक सजगपणाची देखील सध्या नितांत आवश्यकता वाटते.’

(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०२१)