साधकांचे जीवन घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टरांजवळ उभे राहून साधकांकडे पहातांना पुष्कळ प्रेमभाव जाणवणे आणि विचारांत व्यापकत्व आल्याने आनंदाची अनुभूती येणे

श्री. दावोर होर्वात

‘एकदा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तील साधकांचा परात्पर गुरु डॉक्टरांसमवेत सत्संग होता. त्या वेळी परात्पर डॉक्टरांनी मला बोलावले आणि त्यांच्या शेजारी उभे राहून सर्व साधकांकडे हळूहळू पहाण्यास सांगितले. साधकांच्या डोळ्यांत पहातांना मला त्यांच्याप्रती पुष्कळ प्रेमभाव जाणवू लागला. मला प्रत्येक साधकाविषयी इतकी जवळीक आणि प्रेम वाटू लागले की, ‘प्रत्येकाजवळ जाऊन ते व्यक्त करावे, प्रत्येक साधकाची काळजी घ्यावी’, असे वाटू लागले. ‘साधकच माझे सर्वकाही आहेत आणि त्यांच्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावू शकतो’, असे त्या वेळी मला वाटत होते. साधकांविषयीचे प्रेमभावयुक्त विचार व्यापक झाल्याने मला आनंदाची अनुभूती येत होती. मला माझे अस्तित्व नगण्य वाटत होते; परंतु त्याच वेळी मी खंबीर असल्याचेही मला जाणवत होते. हे सर्व विचार साधकांबद्दलचे असले, तरी माझे मन मात्र रिक्तच होते. हे सर्व हृदयातून येत होते.

मी ही अनुभूती माझ्या कक्षात बसून लिहित असतांना माझी दृष्टी सहज सहसाधकांवर पडली आणि मला पुन्हा साधकांप्रती तसाच प्रेमभाव जाणवला.’

– श्री. दावोर होर्वात, क्रोएशिया, युरोप. (२३.२.२०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक