सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३८ नवीन रुग्ण

प्रतिकात्मक छायाचित्र

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ३८ नवीन रुग्ण आढळले, तर एकही मृत्यू नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ३८८ आहे. १९ सप्टेंबरला ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८ सहस्र ६८८ झाली आहे. सद्य:स्थितीत १ सहस्र ३२७ रुग्णांवर उपचार चालू आहेत. यांपैकी २० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.