सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी केंद्रस्तरावर पर्यटन मंत्रालयाच्या अधिकार्यांशी चर्चा करून या जिल्ह्यात आणि कोकणातही रोजगाराभिमुख कोणते प्रकल्प आणता येतील, यासाठी मी प्रयत्न करीन, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाला सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्याचे ‘सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघा’चे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची १८ सप्टेंबरला महासंघाच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली अन् महासंघाच्या वतीने २७ सप्टेंबर या दिवशी मालवण येथे होणार्या जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. या वेळी महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, सचिव अधिवक्ता नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष डी.के. सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी रापण संघ आणि हॉटेल व्यावसायिक यांच्या समस्या केंद्रीय मंत्री राणे यांच्यासमोर मांडल्या.