राज्यात दिवसभरात ४ सहस्र ४१० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई – राज्यात १७ सप्टेंबरला दिवसभरात कोरोनाचे ४ सहस्र ४१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ६७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून ३ सहस्र ५८६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०८ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख २४ सहस्र ७२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत १ लाख ३८ सहस्र ३८९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.