पूर्णिया (बिहार) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणाची हत्या !

  • धर्मांध हे गुंडगिरी करण्यापासून ते आतंकवादी कारवायांपर्यंत सर्वच समाज विघातक कारवायांमध्ये गुंतले असतांनाही कुठलेही सरकार त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • हिंदू अजूनही संघटित झाले नाहीत, तर उद्या हीच वेळ त्यांच्यावरही येईल, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक
  • हिंदूंचे रक्षण करण्यासाठी कुठलेही सरकार सक्षम नसल्यामुळेच हिंदु राष्ट्राची नितांत आवश्यक आहे, हे आता तरी जाणा ! – संपादक

पूर्णिया (बिहार) – येथे महंमद लाहला नावाच्या धर्मांधाने सनी सिन्हा नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. १३ सप्टेंबर या दिवशी ही घटना घडली.

सिन्हा कुटुंबियांनी त्यांच्या घरात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महंमद लाडला आणि त्याचा मित्र महंमद लाल या दोघे निमंत्रण नसतांनाही मद्यधुंद अवस्थेत कार्यक्रमासाठी आले. तेथे त्या दोघांनी धूम्रपान करण्यास चालू केले. यास जेव्हा सिन्हा यांच्या घरातील लोकांनी विरोध केला, तेव्हा महंमद लाडला आणि महंमद लाल यांनी बराच गोंधळ घातला. त्यानंतर ते दोघे निघून गेले. त्यानंतर ते दोघे २०-२५ गुंडांच्या एका टोळीला घेऊन पुन्हा सिन्हा यांच्या घरी आले. तेव्हा सनी सिन्हा हे महंमद लाडला आणि महंमद लाल यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता त्यांनी सनी यांच्यावर चाकूद्वारे वार करून त्यांची हत्या केली. यानंतर सर्व जण फरार झाले. घटनेनंतर जनता दल (संयुक्त) पक्षाचे खासदार संतोष कुशवाहा यांनी सिन्हा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची जलद गतीने सुनावणी करण्याचे आश्‍वासन दिले.

हत्येपूर्वी स्थानिक लोकांनी आरोपींविरुद्ध तक्रार करूनही पोलिसांनी आरोपींना केवळ समज देऊन सोडून दिले !

सरकारने संबंधित पोलिसांनाही या हत्येस उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे ! – संपादक

सनी सिन्हा यांच्या हत्येनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. महंमद लाडला आणि महंमद लाल हे सिन्हा यांच्या घरात गोंधळ घालून निघाले, तेव्हाच स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. तथापि पोलिसांनी या दोघा आरोपींना बोलावून त्यांना केवळ समज देऊन सोडून दिले. त्यामुळे त्यांनी पुन्हा येऊन सनी सिन्हा यांची हत्या केली. जिल्ह्यात पोलीस संरक्षणातच अमली पर्दार्थांची विक्री केली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.