मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), १५ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मलकापूर नगरपालिका भाविकांना आग्रह करणार नाही, तसेच यंदा उद्घोषणाही करण्यात येणार नाही, असे आश्वासन मलकापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ. विद्या कदम यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाने गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, या मागणीसाठी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी हे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी नगराध्यक्ष श्री. अमोल केसरकर, नगरसेविका सौ. सोनिया शेंडे, नगरसेविका सौ. माया पाटील, नगरसेविका सौ. शालन पाटील, नगरसेविका सौ. संगिता पाटील, नगरसेवक श्री. सुहास पाटील, नगरसेवक श्री. प्रल्हाद पळसे, माजी नगराध्यक्ष श्री. राजू भोपळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ, धर्माभिमानी श्री जितेंद्र पंडित, श्री. विश्वास पाटील, श्री. राजू ढेकणे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रसाद कुलकर्णी, अनंत ढोणे, सुधाकर मिरजकर उपस्थित होते.
विशेष
या वेळी बहुतांश नगरसेवक, नगरसेविका यांनी ‘श्री गणेशमूर्तीं विसर्जन हे शास्त्रानुसार वहात्या पाण्यातच झाले पाहिजे’, असे ठामपणे सांगितले.