नवी देहली – सध्या राज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. केंद्र सरकारने महसुलीद्वारे मिळालेला पैसा मोठ्या प्रमाणात स्वतःकडे ठेवला आहे. केंद्र सरकार पैसे खर्च करण्यास टाळाटाळ करत आहे. हा पैसा केंद्र सरकारकडून राज्यांसमवेत वाटून घेतला जात नाही, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलत होते. अर्थव्यवस्थेचा लोकांवर होणार्या परिणामांविषयी राजन म्हणाले की, अगदीच कठीण परिस्थितीमध्ये भारतातील लोक कुटुंबाकडील सोने तारण ठेवतात. अशा पद्धतीने सोने तारण ठेवण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे.