‘आमच्या घरी नवरात्र असते. १८.१०.२०२० या नवरात्रीच्या दुसर्या दिवशी घरी पूजा झाली आणि देवाला नैवेद्यही दाखवून झाला. त्यानंतर नवरात्रीनिमित्त झालेल्या भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना मला आमच्या स्वयंपाकघरात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. मला थोड्या वेळाने पिवळा प्रकाश दिसला. माझा मुलगा आणि यजमान यांना मी स्वयंपाकघरात बोलावले आणि ‘तुम्हाला स्वयंपाकघरात कसे वाटत आहे ?’, असे विचारले. तेव्हा ते दोघे म्हणाले, ‘‘पुष्कळ छान वाटत आहे. चैतन्य जाणवत आहे.’’ गुरुचरणी कृतज्ञता !’
– सौ. मीरा येरावार, नागपूर (२७.१०.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |